रॉ {Research and Analysis Wing} आणि आयबी {Intelligence Bureau} या भारतातील गुप्तचर संस्था आहेत.



या संस्था केंद्र सरकारमधील गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येतात.



'आयबी' ही भारताची अंतर्गत गुप्तचर संस्था आहे तर रॉ ही भारताची बाह्य गुप्तचर संस्था आहे.



आयबी च्या मुख्य कार्यामध्ये 'काउंटर इंटेलिजन्स, दहशतवाद विरोधी, व्हि.आय.पी सुरक्षा, सिमावर्ती भागात गुप्त माहितींचे संकलन' यांचा समावेश होतो.



रॉ ही शेजारी देशांच्या किंवा विरोधी देशांच्या क्रियाकलपांवर नजर ठेवून गुप्त माहितींचे संकलन करते.



रॉ ही भारतविरोधी देशांत गुप्त ऑपरेशन राबवते, भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीमध्येही त्यांचे चांगले योगदान आहे.



आयबी ची स्थापना २३ डिसेंबर १८८७ ला इंग्रजांनी केली, स्थापनेमागील हेतू त्यांच्या विरोधातील भारतीय बंडखोर तसेच राजामहाराजांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठीचा होता.



रॉ ची स्थापना २१ डिसेंबर १९६८ मध्ये झाली.



चीन आणि पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धानंतर त्यांच्याशी सामना करण्यासाठी प्रामुख्याने रॉ ची स्थापना करण्यात आली.



दोनही संस्थांचे भारताच्या अंतर्गत व बाह्य सुरक्षेत मोठे योगदान आहे.