ही बटणं फक्त स्टाईलसाठी असतात, असा अनेकांचा अंदाज असतो.
मात्र त्यामागेही काही कारणं आहेत. सुरुवातीच्या काळात डेनिम्स किंवा जीन्स ही कामगार वर्गाची मक्तेदारी मानली जात असे.
श्रमाची काम करणाऱ्या कामगारांच्या जीन्सचे खिसे फाटणं ही नेहमीची समस्या होती. खिशांची आवश्यकता असल्यामुळे काम करताना ते फाटणं, कामगारांना परवडणारं नव्हतं,
1873 मध्ये ही समस्या ऐकून जेकब डेव्हिस नावाच्या एका टेलरला कल्पना सुचली.
फाटणाऱ्या खिशांवर उपाय म्हणून त्याने पॉकेट्सच्या कोपऱ्यात धातूची बटणं लावली.
यामुळे खिसे जीन्सला घट्ट चिकटून राहत असत आणि फाटत नसत.
तेव्हापासून ही धातूची छोटेखानी बटणं तुमच्या-आमच्या जीन्सचा अविभाज्य भाग झाले.