फर्जंद, फत्तेशिकस्तच्या यशस्वी घोडदौडनंतर दिग्पाल लांजेकर आता 'पावनखिंड' सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हा सिनेमा 21 जानेवारीला प्रदर्शित होणार होता.

पण वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.

आता हा सिनेमा 18 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

'पावनखिंड' सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरने केले आहे.

या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं आराध्य दैवत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण इतिहासातील आणखी एक सोनेरी अध्याय

मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

सिनेमात छत्रपतींच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर झळकणार आहे.

18 फेब्रुवारीला स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा

पावनखिंड सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

दिग्पाल लांजेकरांच्या 'पावनखिंड' सिनेमाचा मुहूर्त अखेर ठरला,

18 फेब्रुवारीला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

त्यागाची आणि पराक्रमाची गौरवगाथा म्हणजे पावनखिंड.