PCOD म्हणजेच, Polycystic Ovarian Disease.

पीसीओडीची समस्या महिलामध्ये अगदी सर्रास दिसून येते.

अनेक महिला आणि मुलींना या समस्येचा सामना करावा लागतो.

PCOD मध्ये महिला शारीरिक आणि मानसिकरित्या अस्वस्थ असतात.

PCOD ची समस्या हार्मोन्समुळे निर्माण होते.

PCOD मध्ये ओव्हरीजमध्ये सिस्ट म्हणजेच, गाठी तयार होतात.

याच सिस्टमुळे महिलांच्या शरीरात हार्मोनल चेंजेंस पाहायला मिळतात.

शरीरातील हार्मोनल चेंजेंसमुळे मासिक पाळीसोबतच प्रेग्नेंसीमध्येही अनेक समस्या निर्माण होतात.

PCOD मुळे शरीराचं वजन वाढतं.

PCOD मुळे अनेक महिलांना सतत अशक्तपणाही जाणवतो.

PCOD चा परिणाम चेहऱ्यावरही दिसतो. चेहऱ्यावर केस येणं तसेच, पिंपल्सची समस्या उद्भवते.

PCOD वर अद्याप कोणतेच उपाय नाहीत

पण आपली दैनंदिन जीवनशैली सुधारुन आपण PCOD ची लक्षणं नक्कीच कमी करू शकतो.