अनेक घरात फोडणीसाठी लसूण वापरला जातो. लसणात अनेक पोषक तत्वे आहेत. जे तुमच्या शरिराला अनेक आजारांशी लढण्यास मदत करतात. लसणाच्या एक पाकळीचे सेवन केल्यास अनेक आजार दूर होतात. तसेच पचनाशी संबंधित समस्याही दूर करण्यास लसूण फायदेशीर ठरतो. ज्यांना रक्त गोठण्याची समस्या आहे त्यांनी दररोज उपाशी पोटी लसणाच्या एका पाकळीचे सेवन करावे. लसणाचे सेवन कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणाया मदत करते. यातील पोषक घटक तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. याशिवाय लसूण शरिराला डिटॉक्स करण्यास ही मदत करतो.