अनेकांना डाळिंब खायला खूप आवडते. पण डाळिंब खाण्याचे फायदे तुम्हला माहितीये का? जाणून घ्या काय आहेत फायदे. घसा दुखत असेल किंवा तोंड आले असेल तर डाळिंबाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या कराव्या. तोंडास दुर्गंधी येत असेल तर, डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्गंधी जाण्यास मदत होते. ताप आला असेल तर डाळिंबाचे सेवन करावे. डाळिंबाच्या सेवनाने शरिरात वाढलेली उष्णता कमी होते. डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे. ज्यांच्या शरिरात रक्ताची कमतरता आहे त्यांनी डाळिंबाचे सेवन करावे. रक्त वाढीसाठी डाळिंब फायदेशीर ठरते.