तुम्हाला माहितीये का चिकू खाण्याचे काय फायदे आहेत. चिकू मध्ये अनेक पोषक घटक आढळतात. फायबर, व्हीटॅमिन, मिनरल्स या सारखे अनेक पोषक तत्व चिकूत आढळत. यामुळे चिकूचे सेवन केल्यास शरिराला अनेक फायदे मिळतात. चिकूच्या सेवनाने कॅन्सरचा धोका टाळण्या मदत होते. चिकूमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे शरिराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. गर्भवती महिलांनी चिकूचे सेवन केल्यास मळमळ, चक्कर येणे यां सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेच्या रुग्णांसाठी चिकू फायदेशीर मानला जातो. दररोज चिकू उकळून त्याचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. चिकूचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.