तुम्हाला पाठीला मुक्का मार लागलेला असेल तर काही घरगुती उपाय करू शकतो.



पाठीला ज्या ठिकाणी मार लागला आहे, त्या ठिकाणी कोरफडीचा रस लावून मसाज करू शकता.



मार लागलेल्या ठिकाणी बर्फाने शेक देऊ शकता. दिवसातून दोन-तीन वेळा शेक देऊ शकता.



आंबे हळद, रक्तरोडा उगळून त्याचा लेप मार लागलेल्या ठिकाणी लावावा.



कोमट गरम केलेली वाळू एका कपड्यात घेऊन अलगदपणे मुका मार लागलेल्या ठिकाणी शेकावा.



पाठीला मुक्का मार लागल्यास तुम्ही गरम पाण्याचा देखील शेक देऊ शकता.



पाठीला मुका मार लागला असल्यास अधिक हालचाल करू नये. अधिकाधिक आराम करावा.



मुका मार लागलेल्या ठिकाणी वेदना असह्य होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.



हे उपाय माहिती म्हणून आहे, उपचारासाठी डॉक्टरांशी सल्लामसलत करावे.