चांगल्या आरोग्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. पण बऱ्याचदा पाणी पिल्यानंतरही अनेकदा तहान लागून राहिलेली असते. पण यामगचे कारण तुम्हाला माहित आहे का? जर वारंवार पाणी पिऊनही तहान लागणे हे ड्राय माऊथचे लक्षण असू शकते. तोंडात योग्य प्रमाणात लाळ तयार न झाल्यामुळे देखील तहान लागून राहू शकते. तसेच जर भरपूर प्रमाणात पाणी पिण्याची सवय असेल तरीही पाणी पिल्यानंतर तहान लागून राहू शकते. मधूमेहाच्या रुग्णांना देखील इतर लोकांपेक्षा जास्त तहान लागते. शरीरामध्ये जर जीवनसत्त्वांची कमतरता असेल तरीही तहान लागण्याचे प्रमाण जास्त असते. जास्त वेळ जर ऊन्हामध्ये राहिलो तरीही तहान लागण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पाणी पिल्यानंतरही वारंवार तहान लागत असेल तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.