पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली ही अमूल्य देणगी आहे.



मानवाकडून पाण्याचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पृथ्वीवरील लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे.



पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात आहे. पण, त्यापैकी पिण्यायोग्य पाणी फारच मर्यादित आहे. पृथ्वीवर पिण्यायोग्य पाण्याचे मर्यादित साठे आहेत.



वाढती लोकसंख्या आणि उद्योगधंदे यामुळे पाण्याचा वापरही वाढत आहे.



अशा परिस्थितीत सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, पृथ्वीवरील पाणी संपलं तर काय होईल?



पाण्याच्या कमतरतेमुळे पृथ्वी ग्रहावरही परिणाम होईल. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कॅलिफोर्नियाची इम्पीरियल व्हॅली आहे.



येथे गेल्या 100 वर्षांत भूजलाच्या पातळीत सातत्याने घट झाली आहे, यामुळे येथील जमीन 100 फूट खाली गेली आहे.



भूगर्भातील पाणी शोषून काढल्यामुळे तेथे पाण्याच्या कमतरता निर्माण होईल.



पाण्याच्या कमतरतेमुळे भूभाग कमी होण्याबरोबरच भूकंपाचा धोकाही वाढू शकतो, असा अंदाज पर्यावरण शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.



पृथ्वीचे कवच हलकं होत आहे. यामुळे भूकंप होण्याचा धोका वाढू शकतो.



एका अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, मानवांसाठी जगभरातील पाणीटंचाईचे परिणाम मोठी आपत्ती ठरेल.



1995 मध्ये जागतिक बँकेचे उपाध्यक्ष इस्माईल सेरागेल्डिन यांनी भाकीत केलं होतं की, भविष्यात पाण्यामुळे युद्ध होईल