लिची हे सर्वांच्या आवडीचं फळ असतं. लिची खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळण्यास मदत होते. पंरतु जास्त प्रमाणात लिची खाल्ल्यास त्याचे शरीरावर विपरित परिणाम देखील होऊ शकते. यामुळे अनेक समस्या देखील निर्माण होऊ शकतात. लिचीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जास्त लिची खाल्ल्यामुळे शरीरातील साखरेते प्रमाण वाढू शकते. लिची हे गरम असते. यामुळे फूड पॉयजनिंगसारख्या समस्या देखील होऊ शकतात. यामुळे पोट खराब होणे, उलटी होणे यांसारखे त्रास होऊ शकतात. लिची खाल्ल्यामुळे लो ब्लड प्रेशरचा त्रास देखील होऊ शकतो. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर लिचीमुळे तुम्हाला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते.