आता तीन वर्षांनंतर कोरोना महामारीतून जग सावरत असताना कोविड संदर्भात एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, कोरोना विषाणू मोबाईल फोनमुळे परसल्याचा दावा करण्यात आला आहे. कोरोना संदर्भातील या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, जगभरात कोरोना महामारी परसली होती, तेव्हा 45 टक्के कोरोना विषाणूचा प्रसार हा मोबाईल फोनमुळे झाला. या अहवालानुसार, कोरोना विषाणू पसरण्यासाठी मोबाईल हेही एक माध्यम होतं. कोरोना काळात लोकांनी मोबाईलच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही. लोकांनी इतर वस्तू साफ आणि स्वच्छ ठेवण्यावर भर दिला पण, मोबाईलच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं. यामुळे हा आजार अधिक पसरण्यास मदत झाली आणि इंफेक्शन जास्त प्रमाणात पसरलं. अहवालानुसार, 45 टक्के कोविड विषाणू हे मोबाईल फोनमुळे पसरले. संशोधकांनी 2019 पासून ते 2023 या काळात SARS-CoV-2 च्या प्रसाराचं माध्यम जाणून घेण्यासाठी मोबाईल फोनची तपासणी केली. यामध्ये 45 टक्के मोबाईल फोनमध्ये कोविड-19 व्हायरस असल्याचं अभ्यासात आढळून आलं. 511 पैकी 231 मोबाईल फोनवर कोविड व्हायरस आढळला. इंफेक्शन एंड पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.