कलिंगड आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. कलिंगडाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
कलिंगड नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे आढळतात. ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
पण कलिंगडाप्रमाणेच कलिंगडाच्या बियांचेही अनेक गुणकारी फायदे आहेत.
तुम्ही कलिंगड खाताना बिया फेकून देत असाल, तर ही बातमी तुम्ही नक्की वाचायला हवी.
कलिंगडाच्या बियांमध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, कॅल्शियम, लोह, मॅग्नीशियम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम, झिंक, तांबे, मॅगनीज, फोलेट, फॅटी ॲसिड ही पौष्टिक तत्वे आढळतात.
संशोधनानुसार, असा दावा करण्यात आला आहे की, मधुमेहाच्या उपचारांमध्ये कलिंगडाच्या बिया अतिशय गुणकारी ठरू शकतात.
जेव्हा शरीरात ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते तेव्हा ते ग्लायकोजेनच्या रूपात शरीरात साठवले जाते, यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असल्यास मेंदूची लक्षात ठेवण्याची आणि नवीन शिकण्याची क्षमता कमी होऊ लागते.
मेंदूशी संबंधित या आजाराचे नाव अल्झायमर आहे.
जर मेंदूशी संबंधित ही समस्या सुरुवातीच्या टप्प्यात आढळून आली, तर मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचे सेवन करून ही समस्या वाढण्यापासून रोखली जाऊ शकते.
कलिंगडाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे कलिंगडाच्या बियांचे सेवन केल्यास मेंदूचे आरोग्य सुधारते.