मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग होताना पाहायला मिळत आहेत. या काळात कोरोना विषाणूमध्ये बदल झाला आहे.



कोरोना विषाणूने काळानुरुप स्वत:मध्ये बदल केले आहेत. आतापर्यंत कोरोना डेल्टा, अल्फा, ओमायक्रॉन हे व्हेरियंट आढळले.



त्यानंतर या व्हेरियंटचे सब-व्हेरियंट आढळले. विषाणूमध्ये बदल झाल्यामुळे त्याच्या लक्षणांमध्येही सातत्याने बदल होताना पाहायला मिळाला आहे.



सध्या जगभरात XBB 1.5 आणि BF.7 व्हेरियंटचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरल्याचे दिसत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते गेल्या काही काळात कोरोनाच्या लक्षणांमध्ये बदल झाल्याचे दिसून आले आहे.



कोरोनाच्या लक्षणांमध्ये सर्दी, ताप, खोकला ही सुरुवातीलपासून सर्वात सामान्य लक्षणे आहेत. पण कोविड विषाणूप्रमाणे त्याची लक्षणे देखील काळानुसार बदलत आहेत.



त्यानंतर थकवा येणे, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी, गोंधळलेली अवस्था आणि बदललेली चव, गंध न येणे, ही लक्षणे रुग्णांमध्ये आढळून आली.



एका रिपोर्टनुसार, गेल्या काही महिन्यामध्ये आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये काही नवीन लक्षणे दिसून आली आहेत.



सदी आणि ताप नाही 'ही' आहेत नवीन लक्षणे - घसा खवखवणे, डोकेदुखी, पाठदुखी, कंबर दुखी, अंगदुखी, नाक वाहणे, थकवा, शिंका येणे, रात्री घाम येणे.



ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये अनेकदा सामान्य सर्दीसारखी लक्षणे दिसतात, असं शास्त्रज्ञांचं मत आहे.



अनेक शास्त्रज्ञांना कोरोना विषाणूच्या मानवी शरीरावरील परिणामावर वेगवेगळं मत व्यक्त केलं आहे.