अंजीरमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर आहेत,
अंजीरमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. हे खाल्ल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात.
हिवाळ्यात अंजीर खूप खाल्ले जाते. अंजीर दुधात मिसळून खाल्ल्याने अनेक आजारांवर फायदा होतो.
अंजीरमध्ये जीवनसत्त्वे, फायबर, प्रथिने, अँटी-ऑक्सिडंट्स, पोटॅशियम,
कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात.
अंजीरमध्ये ऑक्सलेट असते ज्यामुळे स्टोनचा धोका वाढतो.
अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने स्टोन तयार होतात. किडनी स्टोन असेल तर अंजीर खाणे टाळावे.
अंजीर पचनासाठी फायदेशीर आहे, परंतु ते पचनाशी संबंधित अनेक समस्यांचे कारण देखील बनू शकते.
अंजीरमध्ये सल्फाइट असते. यामुळे मायग्रेनची समस्या उद्भवू शकते.
डोकेदुखी किंवा मायग्रेनच्या बाबतीत अंजीर खाऊ नये. डोकेदुखीमध्ये अंजीर खाल्ल्याने त्रास वाढू शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.