कलिंगडात पाण्याचं प्रमाण भरपूर असतं आणि तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं.
कलिंगड शरीरातील कोणत्याही प्रकारची जळजळ दूर करण्यास मदत करते.
कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
कलिंगड गोड आहे, त्यामुळे त्यात साखरेचे प्रमाण जास्त असू शकते असा गैरसमज काही लोकांमध्ये असतो.
100 ग्रॅम कच्च्या कलिंगडमध्ये फक्त 6.2 ग्रॅम साखर असते. त्यात कॅलरीज कमी असतात, त्यामुळे वजन वाढण्याची भीती बाळगण्याची गरज नाही.
अभ्यासात असे आढळून आले आहे की लाइकोपीन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब राखण्यास मदत करू शकते.
लाइकोपीनचे अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म वय-संबंधित मॅक्युलर डिजेनेरेशन (AMD) टाळण्यास मदत करू शकतात.
कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे तुमच्या हिरड्या निरोगी ठेवण्यास मदत करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.