संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि एन्टीऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असतात. संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते.
तसेच, संत्र्यांत व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन E भरपूर प्रमाणात असतं. यामुळे देखील केसांची वाढ होते.
आवळ्याचा ज्यूस हा व्हिटॅमिन C चा एक चांगला सोर्स आहे. केसांना हेल्दी ठेवण्यासाठी आवळ्याचा ज्यूस फार फायदेशीर आहे.
आवळ्याच्या ज्यूसमध्ये कॅल्शियमदेखील असतं. यामुळे तुमचे केस पातळ होत नाहीत.
केसांच्या वाढीसाठी बीटचा ज्यूस फारच गुणकारी आहे. विशेष म्हणजे, बीटचा ज्यूस फार हेल्दी पण असतो.
महिलांमध्ये जर हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर बीटचा ज्यूस तुमच्यासाठी गुणकारी आहे.
इतर ज्यूसप्रमाणेच नारळाच्या पाण्यामध्येही पौष्टिक गुणधर्म आढळतात. यामुळे केसांची वाढ होते.
नारळाचं पाणी शरीर हायड्रेट ठेवण्याचं देखील काम करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.