केस गळणे ही एक अशी समस्या आहे जी महिला असो आणि पुरुष सगळ्यांमध्ये आढळते. ही समस्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होते.
तुम्हाला जर केसगळतीची समस्या जाणवत असेल तर तुम्ही आवळ्याचा रस देखील पिऊ शकता.
आवळ्याचा रस केसांसाठी उत्तम मानला जातो. यामुळे केसगळती बऱ्यापैकी थांबते.
गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई सारख्या अनेक उत्कृष्ट पोषक तत्वांचा समावेश आहे, म्हणून गाजराचा ताजा रस प्या.
यामुळे तुमच्या केसांचे पोषण होईल आणि केस गळण्याची समस्या हळूहळू कमी होईल.
किवीचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत. किवी व्हिटॅमिन ईचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. याशिवाय इतरही अनेक पोषक घटक आढळतात.
हेअर फ्रेंडली ड्रिंक्समध्ये किवीचा समावेश होतो. यामुळे केस गळतीच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
केसगळती थांबवण्यासाठी तुम्ही काकडीचा ज्यूसही पिऊ शकता. या ज्यूसमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात.
काकडीच्या रसात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे केस निरोगी आणि मजबूत होतात. यामुळे केस घनदाट आणि चमकदारही होतात.