भारतीय क्रिकेट संघाला 18 ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे.



या मालिकेसाठी वॉशिंग्टन सुंदरची भारतीय संघात निवड झाली होती.



परंतु, खांद्याच्या दुखापतीमुळं त्याला या मालकेला मुकावं लागलंय.



त्याच्या ऐवजी भारतीय ए संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमदचा संघात समावेश करण्यात आलाय.



शाहबाज अहमद देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो. त्यानं भारतीय ए संघाचंही प्रतिनिधित्व केलंय. पण आता त्याला भारताच्या आंतरराष्ट्रीय संघाकडून कॉल आलाय.



शाहबाज हा स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे. तो संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो. त्याच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकल्यास तो प्रभावी ठरला आहे.



शाहबाजनं प्रथम श्रेणी सामन्यांच्या 29 डावांमध्ये 1 हजार 41 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याच्या नावावर 57 विकेट्सचीही नोंद आहे.



शाहबाजनं लिस्ट ए मध्ये 26 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 662 धावा केल्या आहेत. ज्यात दोन शतक आणि दोन अर्धशतकांसह 14 विकेट्सची नोंद आहे.



एवढेच नव्हे तर, त्यानं आयपीएलमध्येही 29 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 13 विकेट्स घेण्यासोबत 279 धावा केल्या आहेत.