वेस्ट इंडीजला धुळ चारल्यानंत आत भारत झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. यावेळी केएल राहुल कर्णधार असून तो दुखापतीतून सावरला आहे. भारतीय खेळाडू झिम्बाब्वेला रवाना देखील झाले आहेत. बीसीसीआयनं याबाबतचे फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये भारतीय खेळाडू खास भारतीय संघासाठीच्या विमानात दिसल्याचं दिसत आहे. युवा खेळाडूंची फौज या फोटोंमध्ये दिसत आहे. माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणच्या खांद्यावर भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली आहे. दौऱ्यात विराट-रोहित असे दिग्गज खेळाडू नसल्याने भारतीय संघाची धुरा युवा खेळाडूंवर असेल. अशामध्ये अंतिम 11 मध्ये नेमकी कोणा-कोणाला संधी मिळेल हे देखील पाहावे लागेल.