वेस्ट इंडीजला तगडी मात दिल्यानंतर आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारत सज्ज झाला आहे. खेळाडूंनी कसून सरावही सुरु केला आहे. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 18 ऑगस्ट 2022 रोजी हरारे स्पोर्ट्स क्बल येथे खेळला जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघ हरारे स्पोर्ट्स क्बलच्या मैदानावर सरावासाठी पोहोचला आहे. बीसीसीआयनं खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सर्वच खेळाडू कसून सराव करताना दिसत आहेत. युवा खेळाडूंची फौज झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. दीपक चहर बऱ्याच काळानंतर मैदानात दिसेल. बीसीसीआयनं भारतीय खेळाडूंचा खास भारताच्या तिरंग्यासोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. यापूर्वी बीसीसीआयनंं भारतीय खेळाडूंचे झिम्बाब्वे दौऱ्यावर जाताना प्लेनमधील फोटोही शेअर केले होते.