आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू केविन ओब्रायननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.



जून 2006 मध्ये एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या ओब्रायननं 3 कसोटी, 153 एकदिवसीय सामने आणि 110 टी-20 सामन्यांमध्ये आयर्लंडच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय.



त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 हजार 850 धावा केल्या आणि 172 विकेट्स घेतल्या आहेत.



भारतात 2011 मध्ये खेळण्यात आलेल्या विश्वचषकात केविन ओब्रायननं एक संस्मरणीय खेळी खेळली केली होती.



2011 च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध 328 धावांचा पाठलाग करताना धमाकेदारी खेळी केली होती.



त्यानं इंग्लंडविरुद्ध 50 चेंडूत शतक ठोकून क्रिडाविश्वात छाप सोडली. ओब्रायनच्या झंझावत शतकी खेळीच्या जोरावर आयर्लंडनं इग्लंडचा पराभवही केला होता.



एवढेच नव्हे तर, त्यानं पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पणाच्या सामन्यात पहिलं कसोटी शतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.



केविन ओब्रायननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमेटमध्ये शतक झळकावलं आहे.



आयसीसीच्या तिन्ही फॉरमेटमध्ये शतक झळकावणारा केविन ओब्रायन एकमेक आयर्लंडचा खेळाडू आहे.