त्यानंतर कंपनीनं आणखी एका एसयूव्ही कारच्या लॉन्चिंगची घोषणा केलीय. टिगुआन एक मिडसाईज प्रीमिअम एसयूव्ही आहे आणि भारतीय बाजारात याआधीही या कारची विक्री झालीय. नवीन टिगुआन अधिक अग्रेसिव्ह आणि प्रीमियम लूकमध्ये मिळत आहे. ही एसयूव्ही कार बाजारात दाखल होताच मोठ्या प्रमाणात ग्राहकांची पसंती मिळवेल, असा विश्वासही व्यक्त केला जातोय. या कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. टीगआन कारमध्ये नव्या इन्फोटेनमेन्ट सिस्टमसह 8 इंचचा टचस्क्रीन देण्यात आला आहे. ही एक पूर्णपणे लोड केलेले मॉडेल आहे. टीगआनच्या मागील कारच्या तुलनेत नव्या कारमध्ये टर्बो पेट्रोल 2.0-लिटर इंजिन आहे. टीगआनच्या मागील कारच्या तुलनेत नव्या कारमध्ये टर्बो पेट्रोल 2.0-लिटर इंजिन आहे. ही कार एका महागाड्या एसयूव्ही कारसारखी दिसते. ज्यामुळं या कारची किंमती थोडी जास्त आहे.