मुंबईचा कोरोनामुक्त रुग्णांचा दर 97 टक्के इतका आहे. तर 3 हजार 227 सक्रिय रुग्ण आहेत.



मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे.



तीन दिवसांपासून दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.



बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी मुंबईत नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.



तर गुरुवारी 602, बुधवारी 490 रुग्णांची नोंद झाली होती.



21 डिसेंबर म्हणजेच मंगळवारी मुंबईत 327 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.



चार दिवसांपासून कोरोना रुग्णाच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्याचं दिसत आहे.