जणू परीच..मराठमोळ्या श्रुती मराठेच्या घायाळ करणाऱ्या अदा! मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री श्रुती मराठे ही मनोरंजन विश्वाबरोबरच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. आपल्या अभिनयासोबतच आपल्या दिलखेच अदांमुळे श्रुती नेहमीच चर्चेत असते. नुकतेच श्रुतीनं आपले नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. याला कॅप्शन सुचवा म्हणत श्रुतीनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'राधा ही बावरी', ‘जागो मोहन प्यारे’ यांसारख्या अनेक मालिकांमधून श्रुती मराठे घराघरांत पोहोचली. उत्तम अभिनयासोबतच श्रुतीच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.