25 डिसेंबर रोजी सर्वजण एकमेकांना नाताळच्या म्हणजेच ख्रिसमसच्या (Christmas) शुभेच्छा देतात. असं म्हणलं जातं की, या दिवशी प्रभू येशूचा जन्म झाला. जगात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. रंगीबेरंगी लाइट्स, चॉकलेट्स आणि स्टार्सने ख्रिसमस ट्री सजवली जाते. असं म्हणले जाते की ख्रिसमस ट्रीमुळे सर्व निगेटिव्हीटी निघून जाते. ख्रिसमसमध्ये अनेक लोक सांताक्लॉजसारखे कपडे घालून लहान मुलांना गिफ्ट्स देतात. युरोपात 18व्या आणि 19व्या शतकात नाताळच्या शुभेच्छा 'हॅपी ख्रिसमस' बोलून दिल्या जायच्या. इंग्लंडमध्ये तर आजही अनेक लोक नाताळच्या शुभेच्छा 'हॅपी ख्रिसमस' बोलूनच दिल्या जातात. याशिवाय याशिवाय ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनीही 'हॅप्पी ख्रिसमस' हा शब्द वापरला होता. 'हॅपी' आणि 'मेरी' या दोन्ही शब्दांचा अर्थ आनंद असा सारखाच आहे. मात्र, सध्या 'मेरी' हा शब्द अधिक प्रचलित आहे.