'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या चर्चेत आहेत. विवेक अग्निहोत्रींनी नुकताच ट्विवटरला रामराम केला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींनी ट्रोलिंगला कंटाळून ट्विटरला रामराम ठोकला आहे. आता विवेक अग्निहोत्रींनी ट्विटरला अलविदा केल्याने सोशल मीडियावर ते पुन्हा चर्चेत आले आहेत. विवेक अग्निहोत्री गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर अॅक्टिव्ह होते. ट्विटरच्या माध्यमातून ते त्यांचे मत मांडत असत. विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटर डीअॅक्टिव्ह का केलं यासंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही.