मराळमोळी अभिनेत्री सई लोकूर सध्या बालीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.



सई लोकूरने या वेकेशनमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.



या फोटोंमध्ये सई मजेत, सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.



सईने बालीमधील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या हंडारा गेट येथे फोटोशूट केलं आहे.



या फोटोंमध्ये बाली येथील निसर्ग आणि सईचं सौंदर्य फारच खुलून दिसत आहे.



'बिग बॉस मराठी' या रिअ‍ॅलिटी शोमधून अभिनेत्री सई लोकूर घराघरांत पोहोचली. सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.



‘बिग बॉस मराठी’सोबतच, 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील सई झळकली होती.



नेहमी साध्या आणि सोज्वळ लूकमध्ये दिसणाऱ्या सईचा बोल्ड लूकही पाहायला मिळाला आहे.



काही दिवसांपूर्वी सईने बिकनी लूकमधील फोटो शेअर केले होते.



सई लोकूरचे बिकनी लूकमधील फोटोही प्रचंड व्हायरल झाले होते.