बॉलिवूडची धक-धक गर्ल म्हटली जाणारी सुंदर अभिनेत्री माधुरी दीक्षित नेहमीच कोणत्या ना कोणत्या चर्चेत आहे. माधुरीने चित्रपटसृष्टीत बराच काळ व्यतीत केला आहे. 'द फेम गेम' या वेब सीरिजमुळे माधुरी चर्चेत होती. 'द फेम गेम' या वेबसीरिजच्या माध्यमातून माधुरीने ओटीटीवर पदार्पण केलं आहे. माधुरी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. माधुरी दीक्षित आपल्या अभिनयाने आजही प्रेक्षकांना स्तब्ध करत आहे. माधुरी 90च्या दशकातील बॉलिवूडची सर्वात मोठी सुपरस्टार होती. माधुरी दीक्षितने तिच्या आयुष्यात अनेकदा यशाची शिखरे पाहिली आहेत. 6 वेळा ‘फिल्मफेअर पुरस्कारां’वर माधुरीने आपले नाव कोरले आहे. 'तेजाब'चित्रपटामधील 'एक दो तीन' या सुपरहिट गाण्याने माधुरीने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली.