व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कर्करोग आणि हृदयाशी संबंधित घातक आजारांचा धोका संभवतो.

व्हिटॅमिन डी हाडांसाठी आणि प्रतिकारशक्तीसाठी खूप महत्वाचे आहे.

व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या लोकांमध्ये हाडे ठिसूळ होतात, असे संशोधकांना आढळून आले आहे.

त्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोकाही वाढू शकतो.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये मुडदूस होऊ शकतो.

अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हृदयाशी संबंधित आजारही होऊ शकतात.

काही संशोधनानुसार, व्हिटॅमिन डी काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका देखील वाढवू शकतो.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे स्तनाचा कर्करोग, रक्त कर्करोग, अन्ननलिका आणि जठरासंबंधी कर्करोग वाढल्याचे आढळून आलं आहे.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.