मानेच्या मागच्या बाजूला मसाज केल्याने नसा मोकळ्या होतात.

त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होऊन मायग्रेनला आराम मिळतो.

धणे आणि जिऱ्याची पूड करून घेतल्याने मायग्रेनवर आराम मिळतो.

ओमेगा 3 फॅटी अॅसिडयुक्त आहार घ्यायला हवा.

आहारात अॅण्टीऑक्सिडंटयुक्त घटकांचा समावेश करावा.

संत्री, लिंबू, रताळं, टोमॅटो अशा फळांचा समावेश करावा.

कापूर तुपात मिसळून कपाळाला लावावे.

लसणाच्या पाकळ्या वाटून त्याचा लेप किंवा रस कानशिलेवर बांधल्याने त्वरीत आराम मिळतो.

लसणीचा रस किंवा हिंग घालून त्याचे थेंब नाकात घातल्याने मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होते.

तूप हाता-पायाच्या तळव्यांना लावून काश्याच्या वाटीने मालिश केल्याने आराम मिळतो.