आपल्याला त्वचेसंबंधित अनेक वेदना जाणवतात.

यामधलाच एक त्रास म्हणजे पायांच्या टाचांना भेगा पडणे, पाय दुखू लागणे अशा वेदना जाणवतात.

हा त्रास साधारणत: प्रत्येक वयोगटातील लोकांना होतो.

यासाठी काळजी कशी घ्यावी पाहूया....

पायांच्या तळव्यांना वेळोवेळी मॉईश्चरायझर लावा, यामुळे तुमचे तळवे मुलायम राहतील.

पायांच्या तळव्यांना नियमित धुवा, तसेच, स्क्रब करा.

यामुळे तळव्याच्या त्वचेवरील मृतपेशी निघून जातील.

उंच सॅंडल घालू नका यामुळे पायांवर ताण येतो.

मध तुमच्या पायांच्या तळव्यांसाठी रामबाण उपाय ठरू शकतो.

तसेच मधातील गुणधर्मांमुळे तुमच्या पायांच्या तळव्यांना कोणते इन्फेक्शनही होणार नाही.