कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन प्रचंड गाजला. या पर्वातून विशाल याने संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली.
विशालला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि तो या पर्वाचा महाविजेता ठरला. ‘बिग बॉस मराठी’ संपल्यानंतर आता विशाल निकम कोणत्या नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची चाहत्यांना उत्सुकता होती.
विशाल लवकरच नव्या भूमिकेत आपल्याला भेटायला येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आई मायेचं कवच’ या मालिकेमध्ये लवकरच त्याची एण्ट्री होणार आहे.
मालिकेतील त्याचा लुक कसा असेल, त्याचे पात्र काय असेल, हे नुकतेच समोर आले आहे.
विशाल मालिकेत ‘मानसिंग’ नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
आता हा मानसिंग नक्की कोण आहे? त्याचा काय हेतु आहे? हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.