उद्योग नगरी आणि पर्यटनाची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादमध्ये एकाच वेळी दीडशे मर्सिडीज खरेदी करण्याचा विक्रम केला होता.



यामुळं औरंगाबादची वेगळी ओळख जागतिक स्तरावर जाऊन पोहोचली.

याच ऐतिहासिक औरंगाबाद शहरात आता एकाच वेळी जवळपास 250 चारचाकी इलेक्ट्रिक वाहने घेण्याचा विक्रम करण्याची तयारी सुरू केली आहे.

काल यातील 101 गाड्या औरंगाबादकरांना वितरित करण्यात आल्या.

एकाच वेळी दीडशे मर्सिडीज औरंगाबादकरांनी खरेदी केल्या आणि याची चर्चा जगभर झाली.

आता एकाच वेळी 101 इलेक्ट्रिक चार चाकी गाड्या विकत घेत नवा विक्रम केला आहे.

पर्यावरणपूरक अशा ई व्हेईकल खरेदी करण्याचा मुख्य उद्देश आहे मिशन ग्रीन मोबिलीटी.

औरंगाबादमध्ये उद्योजक केवळ चार चाकी वाहनंच नाही तर इलेक्ट्रिकलची वेगवेगळी वाहनं खरेदी करणार आहेत.

यामध्ये बस, टू व्हीलर, तीन चाकी गाड्यांचा देखील समावेश आहे.