पहिलं प्रेम हे प्रत्येकाच्या हृदयाच्या जवळचं असतं, असं म्हटलं जातं. बॉलिवूड कलाकारही याला अपवाद नाही. पहिलं प्रेम विसरता येत नाही, अशी आठवण अभिनेत्री तापसी पन्नूने सांगितली. दहावीच्या परीक्षांमुळे त्यावेळी माझ्या बॉयफ्रेण्डने ब्रेकअप केलं होतं. असा किस्सा 31 वर्षीय तापसीने सांगितला. भुवनेश्वरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात तापसीने आपल्या पहिल्या प्रेमाची गुलाबी आठवण सांगितली. 'मी नववीमध्ये असताना पहिल्यांदा रिलेशनशीपमध्ये अडकले. माझ्या मित्र-मैत्रिणींच्या तुलनेत मला काहीसा उशीरच झाला होता. माझं अफेअर खरंच मजेशीर होतं. दहावीच्या बोर्ड परीक्षा येत आहेत, मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायंच आहे, असं सांगून तो मला सोडून गेला' असं तापसीने हसत हसत सांगितलं. 'मला अजूनही आठवतं.. त्याकाळी आमच्याकडे मोबाईल फोन नव्हते. मी माझ्या घरामागे असलेल्या पीसीओवर जाऊन त्याला फोन करायचे आणि रडत रडत विचारायचे, मला सोडून का जात आहेस?