श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटने दमदार शतक ठोकलं
विराटनं नाबाद 166 धावा ठोकल्या
विराटचं हे 74 वं आंतरराष्ट्रीय शतक होतं.
त्याचं एकदिवसीय कारकिर्दीतील हे 46 वं शतक ठरलं
या शतकासह त्याने अनेक रेकॉर्ड नावावर केले
विराट कोहलीने घरच्या भूमीवर खेळताना सर्वाधिक 22 शतकं झळकावली आहेत.
त्यानं सचिन तेंडुलकरचा घरच्या भूमीवरील 20 शतकांचा रेकॉर्ड तोडला
विराटने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धनेला मागे टाकलं आहे. कोहलीने वनडेमध्ये 12754 धावा करत महेलाच्या 12650 धावांना मागे टाकलं.
श्रीलंकेविरुद्धच्या या शतकात विराटने वनडेच्या एका डावात सर्वाधिक षटकार ठोकले. या खेळीत त्याच्या बॅटमधून एकूण 8 षटकार निघाले.
सध्याच्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके आहेत.