भारत आणि श्रीलंका दुसऱ्या वन-डेमध्या भारत विजयी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत 4 गडी राखून विजयी केएल राहुलचं नाबाद अर्धशतक कुलदीप यादवची कमाल गोलंदाजी आधी नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी निवडली 215 धावा करत 216 धावांचं माफक लक्ष्य भारताला दिलं. पण ते करतानाही भारताची वरची फळी स्वस्तात बाद झाल्याने सामना काहीसा रंगतदार झाला. अखेर राहुलच्या संयमी अर्धशतकाने सामना भारताने जिंकला. पांड्यानेही राहुलला चांगली साथ दिली. ज्यामुळे भारताने 6 गडी गमावत 43.2 षटकात निर्धारीत लक्ष्य पूर्ण केले. तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकलेल्या भारताने आजही विजय मिळवत मालिकाही 2-0 च्या विजयी आघाडीने नावे केली आहे.