विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत दिमाखात सुरुवात केली.

विराट कोहली आणि राहुल यांनी 165 धावांची भागिदारी करत विजय हिसकावून आणला.

विराट कोहलीला जबराट फिल्डिंगमुळे गोल्ड मेडल देण्यात आले.

फिल्डंग कोच टी दिलीप यांनी बीसीसीआयच्या वतीने कोहलीला विशेष गोल्ड मेडल दिले.

विराटने हात वर करून आनंद साजरा केला आणि मग पदक दातात पकडत पोझ दिली.

एकदिवसीय फॉर्मेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा (नॉन ओपनर) विराट कोहलीच्या नावावर जमा झाल्या आहेत.

विराट कोहलीने 24 डावात 2720 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली दुसरा भारतीय खेळाडू झाला आहे.

विराट कोहलीच्या नावावर जवळपास 1100 धावांची नोंद झाली आहे.

या सर्व कामगिरीमुळे सर्वत्र विराट कोहलीचे कौतुक होत आहे.