एकदिवसीय फॉर्मेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा (नॉन ओपनर) विराट कोहलीच्या नावावर जमा झाल्या आहेत.



270 डावात विराट कोहलीचा 114 वा 50 प्लस स्कोर आहे.



विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर 11 हजार धावांचा टप्पा पार केला आहे.



तिसऱ्या क्रमांकावर 11 हजार धावा करणारा विराट कोहली पहिलाच खेळाडू आहे.



विराट कोहली विश्वचषकात सर्वाधिक धावा (नॉन ओपनर) करणारा फलंदाज झाला आहे.



आयसीसीच्या व्हॉइट बॉल स्पर्धेत भारातकडून सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे.



विराट कोहलीने 24 डावात 2720 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने सचिनचा विक्रम मोडला.



वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली दुसरा भारतीय खेळाडू झाला आहे.



विराट कोहलीच्या नावावर जवळपास 1100 धावांची नोंद झाली आहे.



विराट कोहलीने विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू म्हणून मान मिळवला.
विराट कोहलीने विश्वचषकाच्या 27 डावामध्ये 15 झेल घेतले आहेत. 2011 ते 2023 यादरम्यान विराट कोहलीचा हा चौथा विश्वचषक आहे.