इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 सोहळ्यात क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची गणना सध्याच्या काळातील सर्वात सुंदर जोड्यामध्ये केली जाते. इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 सोहळ्यात विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत हजेरी लावली. यो सोहळ्यासाठी अनुष्का शर्माने जांभळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस तर विराट कोहलीने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. विराट कोहलीने एबी डिव्हिलियर्ससोबतच्या लाईव्ह शोमध्ये सांगितलं होतं की अनुष्कासोबतच्या पहिल्या भेटीदरम्यान तो फार नर्व्हस झाला होता. या पुरस्कार सोहळ्यात विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत हातात हात घालून पोहोचला. विराट कोहलीसाठी हे वर्ष फलंदाजीसाठी खूप चांगलं ठरलं. आता त्याची नजर आयपीएलमध्ये पहिल्यांदाच आरसीबीला विजेता बनवण्यावर असेल. अनुष्का शर्मा 'चकदा एक्स्प्रेस' या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. अनुष्का आणि विराटने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंट करुन आपलं प्रेम दर्शवतात.