जागतिक क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहलीनं ठोकलं टेस्ट शतक बऱ्याच काळानंतर कसोटी शतक ठोकत पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसह भारतीय क्रिकेट फॅन्सना खुश केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 241 चेंडूत कोहलीनं शतक ठोकलं आहे. भारतीय संघ अडचणीत असताना हे शतक ठोकत विराटनं संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली आहे विराटच्या कारकिर्दीतील हे 75 वं शतक असून 28 वं कसोटी शतक आहे. विशेष म्हणजे जवळपास 3 वर्षानंतर म्हणजे 1205 दिवसानंतर कोहलीनं कसोटी शतक ठोकलं याआधी अखेरचं कसोटी शतक कोहलीनं बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबर 2019 मध्ये ठोकलं होतं. त्यानंतर थेट आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च 2023 मध्ये शतक ठोकलं आहे. आजच्या डावात विराटनं केवळ 5 चौकार ठोकत हे शतक केलं आहे. एकही षटकार त्यानं आज ठोकलेला नाही. विराटकडून आणखी भारी कामगिरी होईल अशा आशा सर्व चाहत्यांना आहे.