दुसऱ्या वन-डेमध्ये भारताचा मोठा पराभव भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विशाखापट्टणमच्या मैदानात पार पडला सामना. भारतीय संघ तब्बल 10 विकेट्सने पराभूत झाला आहे. आधी भारतीय संघाची फलंदाजी फारच खराब झाली. भारतीय संघ अवघ्या 117 धावांत सर्वबाद झाला. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 31 तर अक्षर पटेलनं नाबाद 29 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्कनं 5 विकेट्स घेतल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि ट्रेव्हिस हेड यांनी कमाल अशी शतकी भागिदारी केली. त्यांनीच संघाला हा दणदणीत विजय मिळवून दिला आहे. हेडनं नाबाद 51 तर मार्शनं नाबाद 66 धावा केल्या आहेत.