भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं (Vinesh Phogat) जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचलाय.
जागतिक चॅम्पियनशिप इतिहासात दोन पदकं जिंकणारी विनेश ही पहिली भारतीय महिला ठरलीय.
जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपच्या 53 किलो वजनी गटाच्या कांस्यपदकाच्या लढतीत स्वीडनच्या एम्मा जोआना माल्मग्रेनचा एकहाती पराभव करत कांस्यपदकावर कब्जा केला.
याआधी विनेशनं 2019 च्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत कझाकिस्तानच्या नूर-सुलतानचा पराभव केला होता.
जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे खेळवली जात आहे.
या स्पर्धेत विनेशकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात होती. परंतु, महिलांच्या फ्रीस्टाइल 53 किलो वजनी गटात पात्रता फेरीत तिला मंगोलियाच्या खुल्लान बटखुयागकडून ०-७ असा पराभव पत्करावा लागला.
नुकतीच बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत विनेश फोगटनं दमदार प्रदर्शन केलं होतं.
या स्पर्धेत नॉर्डिक पद्धतीच्या आधारं तिनं सुवर्णपदकावर कब्जा केला.
विनेशने पहिल्या सामन्यात जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेती कॅनडाची कुस्तीपटू सामंथा लीला पराभूत केलं.
त्यानंतर दुसऱ्या सामन्यात विनेशनं नायजेरियाच्या मर्सी बोलाफुनोलुवा अडेकुओरोए आणि तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या केशनी मदुरवलगेचा पराभव केला.