भारताचा युवा आणि मधल्या फळीचा फलंदाज सूर्यकुमार यादव आज त्याचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे.



सूर्यकुमार यादवनं भारताच्या अनेक विजयात मोलाटा वाटा उचलला आहे.



आयपीएलमध्ये विस्फोटक फलंदाजी करणारा सुर्यकुमार आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपली छाप सोडताना दिसत आहे.



दरम्यान, सूर्यकुमारच्या वाढदिवसानिमित्त त्यानं रचलेल्या काही खास विक्रमांवर एक नजर टाकुयात.



एका वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.



या वर्षात सूर्यकुमार यादवनं 37.80 च्या सरासरीनं आणि 182 च्या स्ट्राईक रेटनं 567 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.



नुकताच सूर्यानं भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या रोहित शर्माचा विक्रम मोडला होता. रोहित शर्मानं 2016 मध्ये 497 धावा केल्या होत्या.



सूर्यकुमार यादव सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवची भारतीय संघात निवड झालीय.



ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.