स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्कराझनं वयाच्या 19 व्या वर्षी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवलीय. त्यानं यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात नार्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव करत पहिलं ग्रँडस्लॅम जिंकलंय वयाच्या 19 व्या वर्षी जेतेपद जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरलाय. यासह त्यानं जागतिक टेनिस क्रमवारीतही अव्वल स्थानी झेप घेतलीय. एवढंच नव्हे तर, यूएस ओपनला तब्बल 32 वर्षांनंतर सर्वात तरुण चॅम्पियन मिळाला आहे टेनिसच्या खेळात अमेरिकेचे महान टेनिसपटू पीट सॅम्प्रास यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं पीट सॅम्प्रासनंतर कार्लोस अल्कराझ हा यूएस ओपनचे जेतेपद पटकावणारा दुसरा सर्वात तरूण टेनिसपटू ठरलाय पीट सॅम्प्रासनं 1990 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती. कार्लोस अल्कराझने 1973 पासून एटीपी क्रमवारीत सर्वात तरुण नंबर वन खेळाडू बनण्याचा मान मिळवलाय हा विक्रम सध्या ऑस्ट्रेलियाच्या ल्युटन हेविटच्या नावावर आहे अल्काराझ हा स्टार टेनिसपटू राफेल नदालनंतर 19 व्या वर्षी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा सर्वात तरूण खेळाडू ठरलाय