आयसीसीच्या एलिट पॅनलचा भाग राहिलेले पाकिस्तानचे पंच असद रौफ यांचं बुधवारी (14 सप्टेंबर) लाहोरमध्ये निधन झालंय.
वयाच्या 66 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत माळवली.
असद रौफ यांच्या मृत्युच्या वृत्ताला त्याचा भाऊ ताहिरनं दुजोरा दिलाय.
मृत्यूपूर्वी असद रौफ त्यांचं चप्पलांचं दुकान बंद करून घरी जात असताना रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ज्यामुळं त्यांचा मृत्यू झालाय, अशी माहिती आहे.
असद रौफ यांच्या निधनानं क्रिडाविश्वावर शोककळा पसरलीय.
क्रिकेटचाहते सोशल मीडियाद्वारे रौफ यांना श्रद्धांजली वाहात आहेत. अनेकांनी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत आहेत.
रौफ हे त्यांची पत्नी आणि त्यांच्या दोन्ही मुलांसोबत राहत होते. रौफ हे त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते.
रौफ यांचा एक मुलगा दिव्यांग आहे. तर, दुसरा मुलगा सध्या अमेरिकेत शिक्षण घेऊन परत मायदेशी परतलाय.
रौफ यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना!