ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार आरोन फिंचनं (Aaron Finch) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी होणाऱ्या (11 सप्टेंबर) तिसऱ्या एकदिवसीय सामना आरोन फिंचच्या एकदिवसीय कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल.
आरोन फिंचला दिर्घकाळापासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्याला मागच्या 7 डावात फक्त 26 धावा करता आल्या.
फिंचनं एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आगामी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.
आरोन फिंचनं 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
आरोन फिंचनं त्याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 145 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग, मार्क वॉ आणि डेविड वॉर्नर यांच्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाजही आहे.
ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये रिक पॉन्टिंगनं सर्वाधिक 29 वेळा शतक ठोकलं आहे. तर, डेव्हिड वार्नर आणि मार्क वॉ यांच्या नावावर प्रत्येकी 18-18 शतकांची नोंद आहे.
फिंच रविवारी केर्न्समधील काजलिस स्टेडियमवर त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 146 वा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळणार आहे. तर, कर्णधार म्हणून हा त्याचा 54 वा एकदिवसीय सामना असेल.