शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं. विनायक मेटे यांचा जन्म 30 जून 1970 ला बीड जिल्ह्यातल्या राजेगाव येथे झाला विनायक मेटे हे 1996 साली भाजपच्या सरकारमध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त झाले मराठा महासंघाच्या माध्यमातून त्यांनी गावागावात आपली ओळख निर्माण केली संघटना काढल्यानंतर मेटे यांनी भारतीय संग्राम परिषद नावाचा आपला एक पक्ष स्थापन केला मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य