मराठी अभिनेत्री पुजा सावंत लवकरच दगडी चाळ 2 सिनेमांत झळकणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती मूळ दगडी चाळीत सिनेमाच्या टीमसोबत पोहोचली होती. यावेळी अभिनेता अंकुश चौधरीसह संपूर्ण टीम आणि अरुण गवळीही उपस्थित होते. यावेळी सिनेमाचे पोस्टर देखील दाखवण्यात आले. संपूर्ण गवळी परिवार यावेळी उपस्थित होता. या सर्वाचा एक व्हिडीओ पुजाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिनेमातील बरेच कलाकार या व्हिडीओ दिसत आहेत. पुजा सावंतही सुंदर अशा साडीत यावेळी दिसत आहे. दगडी चाळ 1 मध्येही पुजाचा अभिनय दमदार होता. दगडी चाळ 1 हिट झाल्यानंतर आता अनेकजण आता दगडी चाळ 2 ची वाट पाहत आहेत.