साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतूपतीचा आज 45 वा वाढदिवस आहे. विजयचे चाहते विजयला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. विजयनं साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या विजयला त्याच्या कमी उंचीमुळे आणि चेहऱ्यामुळे कुठेही संधी मिळायची नाही. पदवी घेतल्यानंतर उदरनिर्वाहासाठी त्याने एका रिटेल स्टोअरमध्ये सेल्समनची नोकरी सुरु केली. त्यानंतर एका फास्ट फूडच्या दुकानात कॅशिअरची नोकरीही केली. विजय सेतूपतीनं फोन बुधवर ऑपरेटर म्हणून देखील काम केले. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या थेनमुर्क परुवाकाटरू चित्रपटामध्ये पहिल्यांदा विजय सेतूपती यांना मोठा रोल मिळाला. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ऑरेंज मिठाई या चित्रपटाचं विजय सेतुपतीनं लेखक आणि निर्माती केली आहे. रिपोर्टनुसार, विजय सेतूपती हा जवळपास 110 कोटी संपत्तीचा मालक आहे. विजयचे 'विजय सेतुपति प्रॉडक्शन' नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. विजय सेतूपती यांच्याकडे लग्झरी कार देखील आहेत.